युसूफ पठाणनवर ५ महिन्यांची बंदी

yusuf pathan

टीम महाराष्ट्र देशा : सध्या भारतीय क्रीकेट संघातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्या प्रकरणी बीसीसीआयने युसूफ पठाणला ५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. युसूफ पठाणने आजारी असतांना काही औषधांचं सेवन केलं होत. मात्र हि औषधे मात्र हे औषध बीसीसीसीआयच्या नियमांमध्ये बसत नसल्याची कल्पना युसूफला नसल्याची माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Loading...

युसूफ पठाणने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेतली होती. युसूफ पठाणने आजारातून बरं होण्याकरता ‘Brozeet’ नावाचं औषध घेतलं. श्वास घेण्यात अडचण येणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जातं. मात्र या औषधातील ‘Terbutaline’ हा घटक उत्तेजक द्रव्यांमध्ये मोडला जातो. युसूफ पठाण राष्ट्रीय क्रिकेटमद्ये बडोद्याच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. मात्र उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे बीसीसीआयने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पुढील ५ महिने संघात न घेण्याचे आदेश दिले आहेत.Loading…


Loading…

Loading...