fbpx

आईनेच केले मुलाचे ‘इसिस’सोबतचे कनेक्शन जाहीर

kalyan

वेब टीम :कल्याणमधील एक युवक इसिस या दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . युसूफ खान असं या युवकाच नाव असून मागील सहा महिन्यांपासून तो बेपत्ता होता. या पार्श्वभूमीवर त्याच्या आईनेच युसूफचे ‘इसिस’सोबतचे कनेक्शन जाहीर केले आहे.

काही दिवसांपूर्वी युसूफला शोधण्यासाठी त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तपास सुरू असताना एटीएसला युसूफ अख्तर शेख ‘इसिस’च्या संपर्कात असल्याचे ठोस पुरावे मिळाले. युसूफ ११ मे २०१६ रोजी बेपत्ता झाला होता. आता त्याचे ‘इसिस’सोबतचे कनेक्शन पोलिसांना समजले आहे.

1 Comment

Click here to post a comment