युजवेंद्र चहलने चाहत्यांना दिली खुश खबर

युजवेंद्र-चहल

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली. आता ही उर्वरीत स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये सुरु होणार असल्याचे बीसीसीआयने घोषित केले आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या कुटुंबावर कठीण परिस्थिती ओढावली होती. युजवेंद्र चहालच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आलं होतं. दरम्यान,युजवेंद्रने कुटुंबासोबत एक फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे.

युजवेंद्र चहलचे आई-वडील कोरोनावर यशस्वीपणे मात करून घरी परतले आहेत. याचा आनंद दोघांनाही झाला आहे. युजवेंद्रने आपल्या इन्स्टाग्रामवर पूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करून तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. आई-वडील सुरक्षित असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचं त्याने चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP