मोदी सरकार विरोधात आज ‘अविश्वास’ ठराव ?

टीम महाराष्ट्र देशा: आंध्रप्रदेशच्या राजकारणात कट्टर विरोधक असणारे टीडीपी आणि वायएसआर कॉंग्रेस आज केंद्र सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीस मोदी सरकारने असमर्थता दर्शवल्यानंतर दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत.
सत्ताधारी भाजपवर असणारा विश्वास उडाल्याने आम्ही अविश्वास ठराव आणत असल्याच  टीडीपीकडून सांगण्यात येत आहे.  दरम्यान टीडीपी आणि वायएसआर कॉंग्रेसला अनेक विरोधी पक्षांनी समर्थन दर्शवले असून काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, एसपीचा पाठींबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेन ही अविश्वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे.

You might also like
Comments
Loading...