fbpx

जाणून घ्या लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला दिल्यास शिवसेनेपुढे काय असणार पर्याय?

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपाने वायएसआर काँग्रेस या पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी दावा केला होता. मात्र, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भाजपाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे.

शिवसेनेच्या दाव्याचे काय?

दरम्यान, शिवसेनेने लोकसभेच्या उपसभापती पदावर दावा केला होता. लोकसभेचे सभापतीपद अर्थातच भाजपला मिळेल, मात्र एनडीएतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष शिवसेना हाच असल्याने अर्थातच शिवसेनेला उपसभापतीपद मिळेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. ज्या अर्थी भाजपने या पदाची ऑफर वायएसआर काँग्रेसला दिली आहे, त्या अर्थी शिवसेनेने या पदाची मागणी सोडली का, किंवा त्या ऐवजी आणखी काही पदरात पाडून घेतले का, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.