विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसच्या अध्यक्षांवर चाकू हल्ला

हैदराबाद : विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम विमानतळावर एका हल्लेखोराने जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जगनमोहन रेड्डी यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

जगनमोहन रेड्डी विशाखापट्टनमहून हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर फ्लाइटची वाट पाहत होते. त्यावेळी हल्लोखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जगनमोहन रेड्डी यांच्याजवळ आला आणि त्याने चाकू हल्ला केला. श्रीनिवास असे या हल्लेखोराचे नाव असून तो विमानतळावरील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे समजते. दरम्यान,हल्लेखोराला जगनमोहन रेड्डी यांच्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.

वायएसआर काँग्रेस मोदी सरकार विरोधात आणणार अविश्वास ठराव

bagdure

आमदार तुकाराम कातेंवरचा हल्ला ‘या’ शिवसैनिकाने परतवून लावला

Comments
Loading...