fbpx

YouTube – युट्युब व्हिडीओ एडिटर होणार बंद

युट्युब वरील इनबिल्ट स्वरूपातील व्हिडीओ एडिटर आता बंद झाले आहे.

युट्युब या साईटवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. व्हिडीओ अपलोड करण्याआधी यावर एक इनबिल्ट व्हिडीओ एडिटर देण्यात आला आहे. यात शीर्षक, उपशीर्षक, कॅप्शन आदींसह व्हिडीओ एडिट करण्याची सुुविधा होती. २० सप्टेंबरपासून हा एडिटर बंद करण्यात येणार असल्याचे युट्युब साईटतर्फे अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे जाहीर सांगण्यात आले आहे. मात्र यामुळे आधी अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओवर कोणतेही बदल होणार नाही.

युट्युब साईटवरील व्हिडीओ एडिटर बंद करण्यात येत असला तरी ट्रिमिंग, ब्लरींग, ऑडिओ लायब्ररी, फिल्टर्स, कार्ड, सब-टायटल्स, एंड स्क्रीन्स, साऊंड इफेक्टस् आणि स्टॅबिलाईज, कॉन्ट्रास्ट, स्लो-मोशन आणि सॅच्युरेशन आणि  क्विक फिक्सेस फिचर्स राहणार आहे. २०१० साली युट्युब वर व्हिडीओ एडिटर देण्यात आला होता. सात वर्षानंतर याला बंद करण्याचा निर्णय युट्युब ने घेतला आहे.

Please Subscribe Our YouTube Channel

4 Comments

Click here to post a comment