बीडमध्ये युवकांचा अनोखा उपक्रम, केली जातीयवादाची होळी

beed holi

टीम महाराष्ट्र देशा- “राष्ट्रपुरुष आपल्या हक्काचे, नाही कोणत्या जातीचे” हा विचार मनात ठेवून राष्ट्रीय एकात्मतेच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प करत काल बीड शहरातील युवकांनी एकत्र येत जातीयवादाची होळी केली.

वाईट गोष्टींचे दहन करून होळी साजरी करण्याची ग्रामीण भागात प्रथा आहे. सध्या उफाळलेल्या जातीयवादाने आपल्या भारतीय समाजात दरी निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जातीयवादाला हवा देण्याचे काम काही विघातक प्रवृत्तींकडुन होत असल्याने आपण सगळे भारतीय आहोत याचा विसर पडू लागला आहे. म्हणून बीडमध्ये आज शेकडो तरुणांनी एकत्र येऊन या जातीयवादाचे दहन करत होळी साजरी केली. या उपक्रमाचे आयोजन हिंदू युवा प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले होते.

उफाळलेला जातीयवाद ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. समाजमन बिघडवण्याचे काम जातीयवादाने होत आहे. समाजात दरी निर्माण झाली आहे. आपण सर्व भारतीय आहोत. देश आपला आहे, ही मानसिकता राहिली नाही, आपल्या जातीचा अभिमान बाळगत इतर जातीला तुच्छतेने लेखण्याचे काम सोशल मीडियातून केले जात आहे, जातीयवादाला गाडून एकसंध समाज निर्माण करण्यासाठी बीडमध्ये सर्व जाती धर्माच्या असंख्य तरुणांनी एकत्र येऊन आज होळीच्या सणाला जातीयवादाचे दहन करत होळी साजरी केली.

holi beed

यावेळी सर्वश्री रमेश पोकळे, संदीप क्षीरसागर, संतोष हांगे, जगदीश गुरखुदे, शेख शफिक, सलिम जहांगीर, भगिरथ बियाणी, स्वप्नील गलधर, महेश वाघमारे, प्रमोद पुसरेकर, राजेंद्र काळे, बाळासाहेब आंबेकर, धनंजय वाघमारे, महेश धांडे, चंद्रकांत जोशी, अजिंक्य पांडव, दत्ता परळकर, विलास बामणे, अमोल वडतिले, भुषण पवार, मनोज ठाणगे, गणेश गुरखुदे, गोपाल पारिक, गणेश पटेल यांसह सर्व जाती-धर्मातील नागरिक उपस्थित होते.

या अनोख्या होळीसाठी हिंदु युवा प्रतिष्ठानचे स्वप्निल कुलकर्णी, अक्षय भालेराव, कौशल खडकीकर, अजिंक्य दोडके, भालचंद्र कुलकर्णी, बंटी सेलमोकर, महेश पांडव, विशाल मालेगावकर, रवि बुट्टे, पंकज विजन, कपिल थिगळे, राधेशाम गुरखुदे, रोहित कुलकर्णी, प्रशांत रामदासी, घनश्याम भोगे यांनी पुढाकार घेतला.