औरंगाबाद येथे विदयापीठाच्या वसतीगृहात युवकाची आत्महत्या

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहातील एका विदयार्थ्याने आज दुपारी वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. काकडे कंटारी ,तालुका घनसावंगी येथील अमोल रघुनाथ काकडे (वय23) हा विद्यार्थी वसतिगृह क्रमांक- 1 मध्ये रूम नंबर 76 मध्ये राहतो. तो एम ए इतिहासात पास झाला असून तो स्वभावाने चांगला होता. तो काल गावावरून आला होता.

आज दुपारी तो कुठून तरी वसतिगृहावर आला ,त्याचे फोनवर बोलणे चालु होते नंतर त्याने खोलीत जावून आत्महत्त्या केली. तो अत्यंत सुस्वभावी मुलगा होता. या घटनेमुळे विदयापीठात खळबळ उडाली असून.फास बसलेल्या अवस्थेतही त्याच्या कानाला हेडफोन लावलेले होते व त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल चालुच होता.

You might also like
Comments
Loading...