“राष्ट्रपुनर्निर्माणासाठी युवकांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकायलाच हवं !!!”

भूषण महाजन : विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत खऱ्या अर्थाने चालना मिळेल अशा “उद्यमशीलतेकडून राष्ट्रपुनर्निर्माणाकडे” ह्या औद्योगिक विषयावर व्याख्यान ठेवले होते.वक्ते होते सुधीरजी मुतालिक.सुधीर मुतालिक हे नाव  खरे तर उद्योगविश्वातले आघाडीवरचे,अ.भा.वि.प. आयोजित करत असलेल्या Dipex 2k15 चे विश्वस्थ  म्हणून सर आज ही ओळखले जातात.पॉझिटिव्ह मिटरिंग पंप चे सर व्यवस्थपकीय म्हणून सर सध्या जबाबदारी सांभाळतात.राज्यस्तरीय तंत्रशिक्षण शुल्क समितीचे सर सदस्य आहेत.”विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता उद्योग क्षेत्रात कामगिरी केली पाहिजे.जोपर्यंत आपलं ध्येय आणि आपण एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्ही कल्पित केलेली संकल्पना म्हणजेच उद्योग अस्तित्वात येऊच शकत नाही.आपल्या देशातून इ.स. १७०० पर्यंत भारतीय रेशमाची भरपूर निर्यात होत होती.त्या काळी आपण अवघ्या जगाच्या बाजारपेठेत अक्षरशः धुमाकूळ घालत होतो.” असं त्या वेळी ते म्हटले.”जर हे राष्ट्र खरच पुनर्निर्मित करायचं असेल तर भारतीय युवकाने बाजारपेठ काबीज केलीच पाहिजे.धंदा सुरू करत असताना संकटं येतीलही पण लगेचच खचायची आवश्यकता नाही.खरे तर संकटं ही संकटं नसतातच मुळी ते तर एक यशाचा मार्ग दाखवायला आलेले असतात.त्यामुळे संकटांच स्वागत करा आणि लागा कामाला.”अशा पद्धधतीने अत्यंत प्रेरणादायक रीतीने त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं.त्यावेळी डावीकडून जेष्ठ प्राध्यापक सचिन कुलकर्णी सर,यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख व्ही एन कपटकर सर,विद्युत परमाणू आणि दुरसंचार विभागप्रमुख एम बी माळी सर तसेच इ-सेल चे समन्वयक प्रफुल ओस्तवाल सर आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.