fbpx

खासदार सुजय विखेंना युथ आयकॉन पुरस्कार प्रदान

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, तसेच विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करत लोकसभेची उमदेवारी लढवली. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून त्यांनी विजयही मिळवला.

आगामी विधानसभा निवडणुकाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान नगर लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये युतीचा झेंडा फडकावणार असल्याचा पणही सुजय विखे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला असून त्यांना गृहनिर्माण खात्याचे मंतीपद देण्यात आले आहे.
सुजय विखे हे एक तरुण नेतृत्व असून, त्यांच्या लोकसभेतील घवघवीत यशानंतर सुजय विखे यांना युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर बादल यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला.