हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत अकोल्यात युवा एल्गार मेळावा

अकोला: गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून भाजपविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नव्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस विदर्भ समन्वयकपदी निवड झालेल्या संग्रामभैया गावंडे यांनी विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अकोल्यात शुक्रवारी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मेळावा आयोजित केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संग्राम गावंडे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असल्याने शहरात राजकीय चर्चेला उधान आलं आहे. कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे मेळाव्याचे अध्यक्ष आहेत.