इंग्रजांना घाबरलो नाही, तर मनसेच्या भेकडांना काय घाबरणार – युवक कॉंग्रेस

मुंबई – इंग्रजांना घाबरलो नाही, तर मनसेच्या भेकडांना काय घाबरणार तसेच राज ठाकरे बांगड्या घाला म्हणत युवक कॉंग्रेसकडून मनसेकडून कॉंग्रेस कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर जाळले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई केली नाही तर काँग्रेस त्यांना बांगड्या भेट देईल असा इशारा युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकुर यांनी यावेळी दिला आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयाची शुक्रवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. यामध्ये काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्या तसेच मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आलीय. दरम्यान हा हल्ला नेमका कोणी केला ते स्पष्ट झाले नव्हते. मात्र मनसेचे संदीप देशपांडे यांनी हा हल्ला आम्हीच केल्याच सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संदिप देशपांडे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता कॉंग्रेस विरुद्ध मनसे वाद उफाळून येताना दिसत आहे.Loading…
Loading...