पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस रस्त्यावर

petrol and congress

दिल्ली: देशात सध्या पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. या वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. याचाच एकभाग म्हणून देशातील अनेक शहरात युवक काँग्रेस तर्फे आज मंगळवारी राजधानी दिल्ली येथे वाढत्या इंधनवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

काल सोमवारी एलपीजी सिलेंडरच्या भावात पुन्हा २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्येत आणखीन भर पडलेली आहे. या वाढत्या भाववाढी विरोधात काँग्रेस आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. या सततच्या आंदोलनामुळे सरकार वर दबाव पडेल का ? मागील काही दिवसांपासुन सुरु असलेले भाववाढीचे सत्र आता तरी थांबेल का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

देशात सध्या सतत इंधन दरवाढ होत आहे, पण केंद्र सरकारला मात्र जग येत नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी आंदोलनाचा सहारा घेतला आहे. त्यात काँग्रेस आग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सुद्धा काँग्रेस अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या