‘युवक कॉंग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न म्हणजे अभ्यास न करता जनतेला गुमराह करण्याचा स्टंट’

satyajit tambe

संगमनेर : महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांनी “आत्मनिर्भर भारत” ह्या योजनेतील २० लाख कोटी रुपये कुठे गेले? ह्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर येवून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

त्यांचा हा आंदोलनाचा प्रयत्न जरी असफल झालेला असला तरीही हे आंदोलन म्हणजे अभ्यास न करता राज्यातील जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न आहे.असा पलटवार सत्यजित तांबे ह्यांच्या आंदोलनाबाबत भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल देशपांडे ह्यांनी व संगमनेर भाजयुमोने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यावर अत्यंत योग्य पद्धतीने आक्रमक होवून भूमिका स्पष्ट केली व ह्याबाबत युवक कॉंग्रेस ला जशास तसे उत्तर दिलेले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या बनावट बईट कशा आहेत व जनता भाजप बरोबर आहे हे आज दाखवून दिले. विक्रांत पाटील ह्यांच्या व प्रदेश युवा मोर्चाच्या भूमिकेसाठी, लोकांसाठी संगमनेर मधील कार्यकर्ते देखील संघर्ष करतील असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मुळात कोणत्याही शासकीय योजना ह्या राबवल्या जातात किंवा त्यातील निधीचा विनियोग कसा होतो किंवा झाला आहे ह्याची माहिती शासकीय कार्यालयात किंवा अगदी वेबसाईट वरती देखील मिळते,परंतु कोणत्याही स्वरूपाचा अभ्यास न करता केवळ स्टंट करण्याचा युवक काँग्रेस चा प्रयत्न आहे असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

खरे तर युवकांची वृत्ती ही चिकित्सक,अभ्यासू असायला हवी.मात्र झुटो ने झुटों से सवाल किया, अशा पद्धतीने लाभार्थी शोधण्याचा युवक काँग्रेसचा प्रयत्न आहे.संगमनेर मध्ये देखील अनेक लोकांना ह्यामधील अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे.राज्यातील कोरिनाची परिस्थिती काय आहे.संगमनेर मध्ये इतके पेशंट वाढता आहेत.नगरपालिका एक रुग्णालय उभारू शकत नाही.पेशंटची प्रचंड लूट चालू आहे.खरेतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेस ने ह्याकडे लक्ष दिले तर जनतेची दुवा मिळेल.परंतु ह्याकडून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हे स्टंट आहेत असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

राज्यात म्हाभकास तिघडी सरकार आहे.दूध उत्पादकांना भाव मिळत नाही परंतु तेच दूध सर्वसामान्य जनतेला दुप्पट भावात मिळत आहे. विद्ार्थ्यांना परीक्षा नसताना देखील परीक्षा शुल्क आकारले जातात. काहीच्या काही वीज बिल येत आहेत.अशी भकास अवस्था राज्य सरकारने केलेली असताना त्यावर आंदोलन का करत नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांची तरतूद केली.त्याचा अभ्यास करून माहिती घ्या.राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेऊन युवक काँग्रेस चालत आहे.आणि राज्य सरकारने जनतेला कोणते आर्थिक पॅकेज दिले ह्याची माहिती युवक काँग्रेस ने द्यावी.अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल देशपांडे, शहराध्यक्ष योगराज परदेशी, दिपेश ताटकर,रोहित चौधरी,राहुलजी भोईर,शैलेश फटांगरे,नवनाथ ववरे,विकास गुळवे,शुभम बेल्हेकर, चिराग साहू,सोमनाथ बोरसे आदी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी केली.

‘कोरोनाच्या संकट काळात फडणविसांच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल

प्रशांत भूषण यांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी

डॉ. निलंगेकर यांचा निलंग्यात भव्य पुतळा उभा करण्याची;सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी