युवक काँग्रेसनेच काढली मणिशंकर अय्यर यांची अंत्ययात्रा

mani ayyar

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानवर मी तितकेच प्रेम करतो जितके मी भारतावर करतो, असे वक्तव्य करणारे माजी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची अंत्ययात्रा युवक काँग्रेसनेच काढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.अय्यर यांचे हे वक्तव्य पाकिस्तानधार्जिणे असून, देशद्रोहीपणा आहे. हा वाचाळवीर काँग्रेसचा असला तरी ते शोभनीय नाही’, असा संताप व्यक्त करीत नागपुरात युवक काँग्रेसने त्यांची अंत्ययात्रा काढून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे .

पूर्व नागपूर विधानसभा युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात जुना बगडगंज कापसे चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. काँग्रेसमधून निलंबित झालेले वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांचे देशद्रोही विधानाचा युवक काँग्रेसने निषेध करून त्यांच्या प्रतिमेला काळे फासून चपला जोड्यांचा मार दिला व त्यांची अंत्ययात्रा गंगाबाई घाटापर्यंत काढण्यात आली.

mani ayyar vs congress youth

अय्यर यांना पाकिस्तानचा एवढाच पुळका आला तर त्यांनी खुशालपणे पाकिस्तानात वास्तव्यास जावे. आज जो तो देशद्रोही वक्तव्य करीत सुटला आहे. मणिशंकर अय्यर हे काँग्रेसमध्ये होते तेव्हाही असे बरळत होते. मणिशंकर अय्यर यांनी देशाची माफी मागावी व आपले शब्द मागे घ्यावे, अन्यथा युवक काँग्रेस निषेधार्थ कार्यक्रम सुरूच ठेवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात राजेंद्र ठाकरे, निखिल बालखोटे, राहुल मोहोड, मन मेश्राम, हर्षद बहादुले, नितीन गुरव, निखिल वांढरे, सौरभ शेळके, प्रज्वल शनिवारे, शहाबाज खान चिश्ती, हर्षल हजारे, बाबू खान, सागर चव्हाण, स्वप्नील ढोके, राज बोकडे, अंकित गुंमगावकर, मयूर नागपूरे, आशिष लोणारकर, देवेंद्र तुमाने, प्रेम गायकवाड, विजय मिश्रा, फरदीन खान, राहुल खेडकर, इरफान शेख, पंकेश निमजे, अतुल मेश्राम, रूपेश चोरागडे, कुलदीप जवणे, निखिल वानखेडे, अप्पू उके, लोकेश धावडे आदी कार्यकर्ते सहभागी होते.