मृत्यूपुर्वी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तरूणाची आत्महत्या

मुंबई: गोरेगावमधील शमूवेल घोरपडे या तरुणाने व्हॉट्सअॅपवर ‘सुसाईड नोट’ पाठवून आत्महत्या केल्याचा घटना घडली आहे. प्रकार गोरेगाव पूर्वेला घडला आहे. प्रेमभंग झाल्याच्या दु:खात त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मी जीव देत असून यासाठी कुणालाही जबाबदार धरु नये’ असा मेसेज शमूवेलने आपल्या आईला आणि मित्रांना पाठवला. त्यामुळे घाबरलेल्या घरातल्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली.

मात्र संध्याकाळच्या सुमारास त्यांच्याच परिसरातील एका रिक्षामध्ये शमूवेल सापडला. यानंतर त्याला तपासणीसाठी ट्रॉमा केअरला नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याने विष प्यायल्याचे स्पष्ट झाले. शमूवेलने रविवारी रात्री विष घेतले होते. त्यामुळे त्याला पुन्हा त्रास सुरु झाला. यावेळी तपासणीदरम्यान शमूवेलने उंदिर मारण्याचे विष प्यायल्याचे समजताच डॉक्टरांनी त्याला सिद्धार्थ रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.शमूवेलला सिद्धार्थ रुग्णालयात नेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र तोपर्यंत शरीरात विष पसरल्याने आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.

You might also like
Comments
Loading...