युवकाची गळफास घेवून आत्महत्या

औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील त्रिमुर्ती चौक येथील उत्तमनगरात राहणाऱ्या  शशिकांत राजेंद्र मगर (वय ३२) या युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. शशिकांत याने अस्त्माहत्या का केली याचे कारण स्पष्ट  नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

ही घटना २१ पेâब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. शशिकांत मगर याने छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी शशिकांत मगर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

उत्तमनगर परिसरात शोकाचे वातावरण पसरले होते. पुढील तपास जवाहर नगर पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या