आपलेच लोकं दहशतवाद, माओवाद्यांना मदत करतात- संभाजी भिडे

वाई: आपलेच लोकं दहशतवाद, माओवाद्यांना मदत करतात. तसेच शत्रूराष्ट्रांकडून सीमेवर रोज आपले सैनिक मारले जातात आणि आपण त्यांच्याबरोबर व्यापारी संबंध ठेवतो आहोत हा विरोधाभास बदलायला हवा. असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केला. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन पुनःप्रतिष्ठापना करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

संभाजी भिडे म्हणाले, हिंदुस्थान बुद्धी, नैसर्गिक साधनसामग्री, कृषी, युवा, ज्ञान या सर्वच बाबतींत जगात अव्वल आहे. परंतु आमची मानसिक गुलामगिरी व सहन करण्याच्या प्रवृत्तीतून सुटका होत नाही, असे परखड मत ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.