विद्यार्थिनीला ‘तुझे नाव सुंदर आहे, अर्थ काय आहे त्याचा?’ असे विचारणाऱ्या उपप्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा

विद्यार्थिनीला ‘तुझे नाव सुंदर आहे, अर्थ काय आहे त्याचा?’ असे विचारणाऱ्या उपप्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा

जालना : जालना शहरातील जेईएस महाविद्यालयात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील उपप्राचार्याने सोशल मीडियाद्वारे मेसेज टाकून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. विजय के. पगारे (जेईएस कॉलेज, जालना) असे संशयित प्राचार्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित मुलीने ऑफलाइन क्लास कधी सुरू होणार आहे, असा मेसेज उपप्राचार्य यांना केला होता. यानंतर पगारे यांनी ‘….. व्हेरी ब्युटीफूल नेम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ….’ असा व्हॉट्सअॅप मेसेज केला. यानंतर पीडित मुलीला चांगलाच धक्का बसला होता.

काही दिवसांनंतर सदर मुलगी व तिची आई पगारे यांच्या केबिनमध्ये गेली होती. त्यावेळीही या उपप्राचार्याने वाईट हेतूने बोलले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपीस अटक झाली हाेती. नंतर जामीन झाला असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या