तुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : तुमचं काम चित्रपट दाखवणं आहे. खाद्यपदार्थ विकणं नव्हे, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनचे कान उपटले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही चित्रपटगृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणू देत नाही, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला. यावर सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात. तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? असा प्रश्न विचारत न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनला झापलं.

Loading...

सिनेमागृहांमध्ये घरचे वा बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदी सुरक्षेच्या कारणास्तव योग्यच असल्याचा दावा करत राज्य सरकारने बंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते. याशिवाय याचिका निकाली काढण्याची मागणीही केली होती. त्यावर आज सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी नागरीक घरचे खाद्यपदार्थ बाळगतात तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? की केवळ घरच्या खाद्यपदार्थांमुळे सुरक्षा धोक्यात येते असा सवाल विचारला आहे.

बाहेरील खाद्यपदार्थांच्या बंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

उपोषणी -उपद्व्याप कश्यासाठी…?Loading…


Loading…

Loading...