तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? हे सोशल माध्यम देणार उत्तर

सोशल माध्यमावर अनेक वेळा स्टेट्स शेअर केल जात. फिलिंग नॉट गुड, फिलिग डिप्रेस पण आता तुम्ही तुमच स्टेट्स शेअर न करता सोशल माध्यमावरील फोटोवरून तुम्ही डिप्रेस आहात हे ओळखले जाऊ शकते.
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरुन ओळखलं जाऊ शकतं, असा अहवाल नुकताच समोर आला आहे.

ईपीजे डेटा सायंस या अहवालानुसार, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो तुमची मानसिक परिस्थिती सांगतात. सर्वसाधारणपणे तुमचे फोटोतील हावभाव, स्टाईल आणि पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट केली जाते. मात्र फोटो यापेक्षाही अधिक काही सांगू शकतात.इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी त्यामध्ये जे काही बदल केले जातात, जसं की कलर फिल्टर वगैरे, यामधून युझर्सची मानसिक परिस्थिती समजते. डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स सामान्य युझर्सच्या तुलनेत जगाला वेगळ्या नजरेतून पाहतात, असंही संशोधनात म्हटलं आहे.

जे लोक डिप्रेशनमध्ये असतात ते त्यांचे फोटो ब्ल्यू, ग्रे आणि डार्क टोन्समध्ये अपलोड करत असल्याचं संशोधनात आढळून आलं, असं हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक अँड्र्यू रेसी आणि त्यांचे सहकारी ख्रिस्तोफर डॅनफोर्थ यांचं म्हणणं आहे.रेसी आणि डॅनफोर्थ यांनी या संशोधनात सहभागी करुन घेतलेल्या युझर्सना ‘डिप्रेस्ड’ आणि ‘हेल्दी’ असे टॅग त्यांच्या मेडिकल रिपोर्टच्या आधारावर दिले. त्यानंतर इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये पॅटर्न्स शोधण्यासाठी लर्निंग टूल्सचा वापर करण्यात आला.

संशोधनात सहभागी असलेल्या डिप्रेशनमधील युझर्सने फिल्टर्सचा वापर कमी केला होता. या युझर्सने केवळ इंकव्हेल या फिल्टरचा वापर केला. या फिल्टरमध्ये फोटो ब्लॅक अँड व्हाईट होतात. तर हेल्दी युझर्सने व्हेलेंसिया या फिल्टरचा जास्त वापर केला, जे फोटोंचा कलर कमी करतात.डिप्रेशनमध्ये असलेले युझर्स केवळ चेहऱ्याचा फोटो पोस्ट करतात. तर हेल्दी युझर्स वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट करणं पसंत करतात.दरम्यान हे संशोधन सर्वच इंस्टाग्राम युझर्ससाठी लागू होत नाही, असंही संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.