Share

BJP । “तुझं मुंडकं धडापासून…”; भाजप आमदाराला PFI कडून धमकी

सोलापूर : देशभरामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातली. अशातच सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI च्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. PFI च्या कार्यकर्त्याने एक पात्र पाठवून देशमुख यांना धमकी दिल्याचं समोर येत आहे.

सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मोहम्मद शफी बिराजदार नावाच्या एका व्यक्तीने पत्र पाठवले आहे. या धमकीच्या पत्रात, “तुझं मुंडकं धडापासून वेगळे करणार आहे” असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे. आयोध्या, काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर असून एका दिवसात उडवून दहशत माजवतील. हे पत्र मिळाल्यानंतर आमदार देशमुख यांनी तातडीने पोलीस आयुक्तांना भेटून पत्र त्यांच्या हवाली केले आहे.

याशिवाय, आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, असंही सांगण्यात आलं आहे. इतकेच नव्हे तर आम्ही मुसलमान आहोत, तुम्ही PFI वर बंदी आणून चुक केली. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार असल्याचा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

यापुर्वी तुम्ही सीमी’ वरही बंदी घातली पण त्याचं काय झालं, तुम्ही PFI ला लाख वेळा बंदी घातली तरी आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आलेला आहे. तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमची मुले गप्प बसणार नाही. घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील, हे लक्षात ठेवा, अशी धमकी या पात्रातून दिली आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

सोलापूर : देशभरामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातली. अशातच सोलापूरचे …

पुढे वाचा

Maharashtra Politics