मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारण्याची आपची मागणी

औरंगाबाद : मराठवाडयामध्ये सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोवीड प्रतिबंधीत लस देणे चालू आहे. परंतू या लस देण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वय नाही. नागरीकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. १ मे पासून तर १८ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे आता मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी आम आदमीचे मराठवाडा संघटक मंत्री सुग्रीव मुंडे यांनी केली आहे.

आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांनी मराठवाडयाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना काही निवेदन देवून मागणी केली आहे. या निवेदनामध्ये ते म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये तर लस देण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलेही नियोजन केलेले दिसत नाही. त्यामुळे लस घेणाऱ्या नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला लस मिळते की नाही ही भिती निर्माण झाली आहे.

वय वर्ष ४५ च्या वरील नागरीकांना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धादंल उडत आहे. केंद्र सरकारने १८ वर्षावरील नागरीकांना १ मे २०२१ पासुन लस देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. राज्यशासनाने जरी १ मे २०२१ ही तारीख पुढे ढकलली असली, तरी या संपूर्ण लसीकरण मोहिमेचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार आहे. व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असल्याचे दिसुन येत आहेत. या करिता यावर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यानी व्यक्त केले आहे.

जिल्हयामध्ये १८ वर्षावरील नागरीकांना तसेच सध्या देण्यात येणाऱ्या ४५ वर्षावरील नागरीकांसाठीच्या लसीकरणा बाबत मराठवाडयातील सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती आराखडा तयार करुन प्रत्येक जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजीत पद्धतीने लसीकरण करावे जेणे करुन लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. सर्वांना लस उपलब्ध होईल असे या निवेदनामधील मागणीमध्ये केली आहे. आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांनी मराठवाडयाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या