तरुणाचा दगडाने ठेचून खून

दौंड /सचिन आव्हाड : दौंड तालुक्यातील देलवडी येथील स्वप्निल ऊर्फ पिंटु ज्ञानदेव शेलार (वय ३०) या तरुणाचा रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दगडाने तोंड ठेचून तसेच दोन्ही हातावर धारदार हत्याराने वार करून खुन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खून झालेल्या स्वप्निल शेलार याच्या घरी रविवारी आखाड पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अतिशय गंभीरपणे ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान स्वप्निल शेलार हा वाळु व्यवसाय करत होता. स्वप्निलचा कोणत्या वादातून खून झाला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी यवत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी भेट देली. आपल्या पोलीस पथकाला आरोपींच्या शोधकार्यासाठी सूचना दिल्या.

सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे वाचले व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती