तरूण पिढीने तंबाखूपासून दूर रहावे- राजकुमार बडोले

मुंबई – तंबाखू सेवन करणे हे आरोग्याला घातक असून यामुळे अनेक प्रकाराचे रोग उद्भवतात. यासाठी महाराष्ट्रातील तरुण पिढीने तसेच सर्व जनतेने तंबाखूपासून दूर राहावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
३१ मे २०१८ हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस जगभरात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने २९ ते ३१ मे या कालावधीत तंबाखूमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन श्री.बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. बडोले यांनी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी तयार केलेले पोस्टर्स, त्यावरील संदेश तसेच रांगोळीची पाहणी केली. तसेच उपस्थितांना महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली. तसेच यावेळी तंबाखूमुक्त शाळा प्रतिकृतीचे उद्घाटन श्री. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सलाम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...