तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहात उद्योजक बनावे; चंद्रकांत पाटील यांचे तरुणांना आवाहन

chandrakant patil

पुणे : सध्याच्या काळात तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतः च्या पायावर उभे राहात उद्योजक बनावे, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पद्मावती परिसरातील आयोजित उद्योजकता विकास अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, शहर सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक सुशील मेंगडे यांच्यासह इतर मान्यवर आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, बदल्यात काळानुसार देश देखील बदलतो आहे. पण ज्यांच्या आदर्शवत कार्यामुळे आपण आज ही प्रगती अनुभवत आहोत, त्यांचे सदैव स्मरण केले पाहिजे. तसेच ही प्रगती बदल चिरस्थायी राहावा यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. कारण या देशाने श्रीमंतीऐवजी वैराग्याला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे वैराग्याचे महत्त्व टिकवत, विकासाच्या यादीत देश क्रमांक पहिल्या तीन किंवा प्रथममध्ये कसा येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आजची तरुण पिढी महत्त्वाचे योगदान देऊ शकते. त्यासाठी तरुण पीढिने उद्योजकतेकडे वळले पाहिजे. तसेच तरुण पीडिला आपल्या महापुरुषांच्या पराक्रमाची जाणिव करुन दिली पाहिजे. दरम्यान, यावेळी परिसरातील कोरोना योद्ध्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या