भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी युवा खासदार तेजस्वी सूर्यांची वर्णी! भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर

Tejaswi surya

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आज राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षवाढीचे काम करणाऱ्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आज केली आहे. यामध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे.

बंगळुरू दक्षिणचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोपावण्यात आली आहेत. तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेतील आपल्या दमदार कामगिरी आणि वक्तृत्व कौशल्याने आपली वेगळी छाप पाडली होती. सद्या, पूनम महाजन या भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या, त्यांच्या जागी आता तेजस्वी सूर्या यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान, या भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासह  विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर या चौघांची राष्ट्रीय सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

खासदार हिना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्तापदी तर जमाल सिद्दीकी यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने बिहार राज्य प्रभारी पदी याआधीच नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-