घरगुती कारणातून गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

घरगुती कारणातून गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

suicide

औरंंगाबाद : घरगुती कारणातून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा उपचारादरम्यान रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घाटीत मृत्यू झाला. विलास परमेश्वर वाघ (वय ३०, रा. गल्ली क्र. ४, मिसारवाडी) असे त्याचे नाव आहे.

विलास हे गट्टूचे बांधकाम करायचे. त्यांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांचा भाऊ व शेजा-याने तात्काळ घाटीत दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विलास यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या