चुकून भाजपाला मत दिल्यामुळे तरुणाने कापले स्वतःचेच बोट !

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाला चुकून मत दिल्यामुळे एका तरुणाने स्वतःचेच बोट कापल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर मधील अब्दुल्ला हुलासनपुर गावातील पवन कुमार (वय २५ ) असे बोट कापून घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

१८ एप्रिलला लोकसभेच्या दुसर्या टप्प्यातील मतदान सुरु होते. पवन कुमार हा बसपा समर्थक आहे. त्याने चुकून बीजेपी च्या उमेदवाराला मतदान केले. हत्ती ऐवजी त्याने कमळ हे बटन दाबले. त्याला आपण ही खूप मोठी चूक करून बसलो असे वाटले. आणि मग काय, त्याने घरी गेल्यानंतर ज्या बोटाने EVM चे बटन दाबले होते ते बोट कापून टाकले.

त्यानंतर पवनला खूप यातना होऊन लागल्याने तो जोरजोरात ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक जमा झाले. त्याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्यानंतर कोणीतरी पवनचा व्हीडीओ बनवून सोशल मीडिया वर अपलोड केला.Loading…
Loading...