व्हॉट्सअपवर तरुणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने तरुणाला अटक

पुणे : तरुणीच्या चेह-याचा वापर करून अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने पुण्यातील एका तरुणाला अटक करण्यात आले आहे. मयुरेश विजय ताकवले (वय-26, रा.कसबा पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव असून फरासखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
ऋषिकेश दादा पेटकर या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर फिर्यादीच्या चेहरा असलेला अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित युवतीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी फरासखाणा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण अंभुरे अधिक तपास करीत आहेत.

You might also like
Comments
Loading...