“तू नेहमीच स्वस्त राहशीलस आणि…” ; कंगनाचा तापसीला उपरोधिक टोला

कंगना

मुंबई : बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय. आता या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनंही उडी घेत तापसीला टोला लगावला आहे.

आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियाद्वारे ‘आता मी स्वस्त राहिले नाहीये’ असे म्हणत वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने तापसीला ‘तू नेहमीच स्वस्त राहशील’ असे म्हणत टोला लगावला आहे.

“तू नेहमीच स्वस्त राहणार आहेस, कारण तुम्ही सगळे बलात्कारी स्त्रीवादी आहात. तुझा रिंग मास्टर अनुराग कश्यपवर २०१३मध्ये देखील कर चोरी प्रकरणामुळे छापे टाकण्यात आले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला रिपोर्ट समोर आला आहे. जर तू दोषी नसशील तर कोर्टात जा आणि ते सिद्ध करुन दाखव” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

याआधी “३ दिवसांच्या शोधात प्रामुख्याने ३ गोष्टींचा समावेश आहे. १. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. २. मी याआधीच नाकारलेल्या ५ कोटी रकमेची ‘कथित’ पावती. ३ सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मधील माझ्यावर टाकलेल्या छापाची आठवण ” या आशयाचे ट्वीट तापसीने केले होते.

महत्वाच्या बातम्या