मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतल्याननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान, ममता आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीविषयी राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून माहिती दिली आहे.
लेखात राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील तरुण, कार्यक्षम मंत्री. मुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत. हा शिक्का त्यामुळे पुसायला हवा. ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. ‘तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगले काम तुम्ही करताय. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाणघेवाण वाढायला हवी. प. बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात,’ असे बॅनर्जी म्हणाल्या. ‘तुमच्याकडे ‘झू’ आहे काय? कोणते प्राणी त्यात आहेत?’ यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील राणी बागेची माहिती दिली. ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला व ममता बॅनर्जी यांनी तो तत्काळ स्वीकारला. ‘लाल, बाल, पाल हा देशाचा त्रिशूल स्वातंत्र्य लढ्यात होता. महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिनचंद्र पाल हे त्या त्रिशुलातले दोन भाले. ‘लाल बाल पाल’च्या निमित्ताने ऐतिहासिक पर्यटन योजना तयार करता येईल. दोन्ही राज्यांतील नव्या पिढीलाही इतिहासाचे भान त्यामुळे राहील.’ असे आदित्य यांनी सांगितले व ममतांनी ते मान्य केले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. ‘तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे’, असे ममता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा
- अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे; फडणवीसांचे शिवसेनेवर ताशेरे
- तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांच मोठं विधान; म्हणाले, तिसरी लाट…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<