फुफुस सिटी स्कॅन टेस्टसाठी आता 7 ते 10 हजार ऐवजी फक्त 2000 रुपयेच मोजावे लागणार

Rajesh Tope

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरला भेट देत आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. पुण्यात कोरोना परिस्थिती बघता, बेड्सची कमतरता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच मास्क व सॅनिटायझरच्या किंमतीवर कॅपिंग आणणारच असल्याची भूमिका टोपेंनी घेतली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी किंमतीबाबत महत्वाची घोषणा करण्यात येईल. तर फुफ्फुस सिटी स्कॅन टेस्टच्या किंमती अवाजवी आहेत. सद्या तब्बल ७ ते १० हजार इतकी आकारली जात आहे. त्या आता कमी करून २००० वर आणण्यात येईल. दुसरीकडे पुण्यासाठी दिलासादायक बाब आता समोर येत आहे. गेले ४ दिवस पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :