अमित शहांच्या कामाचा झपाटा पाहून तुम्हीही व्हाल थक्क

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंदीय मंत्री अमित शहा यांनी मंत्रिपद स्वीकारताचं सरकारी कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे अधिकारी देखील अमित शहांच्या कामाचा वेग पाहून थक्क झाले आहेत.

Loading...

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे यासाठी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यनिहाय प्रचाराचा धडका लावला होता. त्यांच्या या अथक परिश्रमांचे फळ जनतेला लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पाहिला मिळाले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात अमित शहा यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात हजेरी लावत गृहखात्याची जबाबदारी घेतली. गृहखात्याची जबाबदारी अंगावर पडताच शहांनी कामाचा धडाका लावला.

अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या कामाच्या पद्धतीत बदल केला आहे. अमित शहा सकाळी साधारण दहाच्या सुमारास नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात पोहोचतात. यानंतर ते रात्री आठपर्यंत कार्यालयातच असतात. ते दुपारचे जेवणही कार्यालयातच मागवतात. त्यामुळे दोन राज्यमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांनाही शहा घरी जाईपर्यंत कार्यालयातच थांबावे लागते. एवढेच नव्हे तर अमित शहा सुट्टीच्या दिवशीही अनेकदा कार्यालयात येतात. तसेच अमित शहा हे प्रत्येक बैठक आपल्या कार्यालयातच घेतात. याशिवाय, भाजप आणि घटकपक्षांचे नेतेही अमित शहा यांना नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयामध्येच येऊन भेटतात. गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपण कोणत्याही गृहमंत्र्यांला इतका वेळ कार्यालयात काम करताना बघितलेले नाही, असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते.Loading…


Loading…

Loading...