‘पुढचे तीन वर्षे तुम्ही माजी मंत्रीच राहणार’,संजय राऊतांचा टोला

patil-raut

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल असे म्हणत राज्य खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे.

चेंबूरमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की,मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असे चंद्रकांत पाटलांना सांगितले’. तसेच पुढे बोलताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला १५० जागा हव्यात आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव सहन करत इथपर्यंत पोहोचली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे.’ असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव येथे एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या