आपल्यात दडलेल्या हि-याचे मोल जाणून घेतले पाहिजे – कृष्णप्रकाश

अभिजित कटके

अहमदनगर : परमेश्वराने प्रत्येकांला वैशिष्ट्यपूर्ण घडविले आहे.प्रत्येकात एक हिरा लपलेला असुन त्याचं मुल्य समजुन घेण्यांसाठी तळमळ असावी.त्यासाठी कोण काय म्हणतं या टिकेकडे लक्ष न देता प्रत्येकांने आपल्या कार्य कर्तृत्वातून त्या टिकेचा भेद करावा, असे प्रतिपादन स्पेशल इन्सपेक्टर जनरल आॅफ पोलीस कृष्णप्रकाश यांनी केले.

Loading...

आपण जोपर्यंत झोपलेलो असतो तोपर्यंत भाग्यही झोपलेले असते.आपण जेव्हा जागे होतो तेव्हा विचार जागे होऊन आपल्या अंगी कार्यतत्परता येते त्यातून पुढं पाऊल पडतं आणि भाग्य चालायला लागतं,असेही ते म्हणाले.संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने रविवारी संजीवनी शैक्षणिक संकुलात संजीवनी टॅलेंट सर्च २०१७ परिक्षा आयोजित करण्यांत आल्या होत्या.

त्याचे उदघाटन कृष्णप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी कृष्ण प्रकाश यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन ट्रायथ्लाॅन स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा १४ तास ८ मिनीटांमध्ये पूर्ण केल्याबददल संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेसाठी अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील बारावीत शिक्षण घेत असलेल्या चार हजार पेक्षा अधिक विद्यार्थानी सहभाग नोंदविला.कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले की आज प्रत्येकजण धावपळीच्या जीवनात जगत आहे. स्वतःसाठी वेळ काढत नाही. परिणामी मैदानी खेळापासून प्रत्येक जण दूर जात आहे.

पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करून त्या प्रत्येकाला आत्मसात करण्यासाठी आपण सध्या वेळ देत आहोत. जगातील कुठल्याही स्पर्धा कठीण नसतात तर त्या जिंकण्यासाठी मनात एक उमेद जिद्द असावी लागते त्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी निर्णयाची परिपक्वता महत्वाची असते.

मालेगाव येथील कार्यक्रमांतून आपल्याला आयर्नमॅन होण्याची प्रेरणा मिळाली. फ्रान्स येथील आयर्नमॅन स्पर्धेला सामोरे जाताना अनेकांना ती अवघड वाटत होती. पण स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला युवकांमध्ये दडलेली शक्ती काय आहे हे दाखवून दिलं असून त्याचा ध्यास आपण घेतला. मन पोलादासारखं आणि बुध्दी वीजेसारखी असली पाहिजे. झोप हे कलीयुग, जागं राहणं द्वापारयुग, उभं राहणं हे त्रेतायुग आणि धावणं हे सत्ययुगाच लक्षण आहे.Loading…


Loading…

Loading...