अब्जाधीश उमेदवारांची संपत्ती पाहिली , आता वाचा लढवय्या कन्हैया कुमारची किती आहे संपत्ती

टीम महाराष्ट्र देशा : सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार हा बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. भाजपाचे गिरिराज सिंह आणि आरजेडीहून तन्वीर हसन या ठिकाणाहून रिंगणात आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे कन्हैया ने आपली संपत्ती जाहीर केली आहे.

९ तारखेला कन्हैयाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक बाबी उजेडात आल्या आहेत. कन्हैया कुमार याने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार ते बेरोजगार आहे. मात्र लेखन आणि काही ठिकाणी व्याख्यान द्यायला ते जातो. कन्हैयाने एक पुस्तक लिहिले असून त्याचे नाव ‘बिहार टू तिहाड़’ असे आहे. या पुस्तकाची रॉयल्टी हाच कन्हैयाच्या इनकमचा मोठा सोर्स आहे.

कन्हैयाने निवडणूक आयोगाकडे जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्याच्याकडे 24 हजाराची कॅश आहे. त्याच्या एका बॅंक खात्यात 1 लाख 63 हजार 648 रुपये आणि दुसऱ्या खात्यात 50 हजार रुपये जमा आहेत. याशिवाय 1 लाख 70 हजार 150 रुपयांची सेव्हिंग आहे.

कन्हैयाच्या बँकेतील खात्यावर सेव्हिंग आणि इनवेस्टमेंटची एकूण रक्कम 3,57,848 रुपए इतकी आहे. 2017-18 मध्ये त्याचे उत्पन्न 6 लाख 30 हजार 360 रुपये तेच उत्पन्न आता घटून 2018-19मध्ये 2,28,290 रुपयांवर आले आहे.

कन्हैयाने आपल्याकडील अचल संपत्तीचा देखील उल्लेख केला आहे. आपल्याकडे वडीलोपार्डित संपत्ती असल्याचे त्याने म्हटले आहे. दीड एकर जमिनीवर एक दुकान असून त्याची आजच्या तारखेला 2 लाख इतकी किंमत असल्याचे कन्हैयाने म्हटले आहे.

त्याच्यावर धार्मिक सलोखा बिघडवल्याचा, अनाधिकृत सभा घेतल्याचा,कलम 124 A चे उल्लंघन केल्याचे 5 केसेस आहेत. याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी त्याला मतदारांनी 70 लाख रुपये दिले आहेत. अर्थात त्याने क्राऊड फंडींगच्या माध्यमातून 70 लाख रुपये गोळा केले आहेत.