आणि त्यांनी चक्क बाप्पाला बसविले मासांहाराला;या ऑस्ट्रेलियन जाहिरातीचा भारतीयांकडून निषेध.

जगभरामध्ये हिंदुच्या धार्मिक भावना दुखवल्या

भारतीय व त्यांची देवी देवता व धर्म या विषयी असलेली श्रद्धा जगजाहीर आहे. अनेक वेळा जगभरामध्ये भारतीयांच्या धार्मिक भावना दुखवल्या जातात.असेच काही ऑस्ट्रेलियात घडले  आहे.गणपती बाप्पा अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वांचे आवडते दैवत,पण ‘यू नेव्हर लँब अलोन’ या जाहिरातीत देव-देवता एकत्र बसून मासांहार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.मीट अँड लाईव्ह स्टॉक ऑस्ट्रेलिया’च्या या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

या जाहिरातीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावाना दुखावल्या गेल्याने ही जाहिरात तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी येथील हिंदूंनी केली आहे. ‘गणेशोत्सव काळात अनेक भारतीय लोक मांसाहार करत नाहीत.त्यामुळे मांसाहाराच्या पंगतीत गणपतीला दाखवणे चुकीचे आणि अपमानास्पद आहे.यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत

ही जाहिरात तातडीने मागे घेण्यात यावी,अशी मागणी येथील हिंदूंनी केली आहे. हिंदूंच्या आराध्य दैवताला अशा पद्धतीने जाहिरातीत दाखवणे हे असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याची संतप्त प्रतिक्रिया ‘इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’चे प्रवक्ते नितीन वशिष्ठ यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

‘यू नेव्हर लँब अलोन’ ही जाहिरात दोन दिवसांपूर्वी लाँच करण्यात आली होती. तेव्हा ‘मीट अँड लाईव्ह स्टॉक ऑस्ट्रेलिया’च्या मार्केटिंग मॅनेजरनं एक प्रतिक्रिया दिली होती. ‘तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही. पण, लँब मीट अशी गोष्ट आहे, जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात सर्व जण एकत्र जेवायला बसून त्याचा आस्वाद घेऊ शकतात. या जाहिरातीत येशू, गणपती आणि इतर देव-देवता, संत एकाच टेबलावर बसून मांसाहार आणि चर्चा करताना दाखवण्यात आले आहे. पण सर्व धर्माच्या लोकांना प्रेम एकत्र आणू शकते, मांसाहार नाही, अशा प्रतिक्रिया हिंदूंनी दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियन सँडर्ड ब्यूरोकडे या जाहिरातीविरोधात ३० तक्रारी करण्यात आल्या आहे