‘तुमची गरज समाजाला, बिग बॉसला नाही’; शिवलीला यांच्या समर्थकांनी व्यक्त केली नाराजी

shivlila

मुंबई : बिग बॉस मराठीला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन कालपासून सुरवात झाली. बिग बॉस मराठी सीजन तीनमध्ये 15 कलाकार असणार आहेत. या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा चर्चेतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यंदाच्या सीजनमध्ये प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांनी देखील सहभाग घेतला आहे. मात्र त्यांच्या सहभागामुळे समर्थक नाराज झाले असल्याचे दिसत आहे.

 

सोशल मिडीयावर शिवलीला यांना ट्रोल करण्यात येत आहे. अनेकानी सोशल मिडियावर कमेंट करतनाराजी व्यक्त केली आहे. ”खरं तर यांना बिग बॉसच्या घरात यायची गरज नव्हतीच. एकाने ”शिवलीलाताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” तर दुसऱ्याने, ”ताई ,मला वाटतं हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

शिवलीला पाटील या मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या कन्या आहेत. शिवलीला पाटील यांची ‘बिग बॉस’मध्ये भक्तीमय वातावरणात एंट्री झाली. मात्र अभिनय क्षेत्रातील कलाकारांव्यतिरिक्त शिवलीला यांनी सहभाग घेतल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लोक नाराज असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवलीला यांच्यासोबतच यावर्षीच्या शोमध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे देखील सहभागी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या