शेन वॉर्नची संपत्ती ऐकून व्हाल अवाक, निवृत्तीनंतरही ब्रॅण्ड व्हॅल्यू झाला नाही कमी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी थायलंड तेथे हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट मधील निवृत्तीनंतरही त्याचा चाहता वर्ग कमी झाला नाही.

१५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मोठ मोठ्या क्रिकेट चान्नेल साठी क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम केले. त्यामुळे निवृत्तीनंतरही अशा कामांतून त्याने बक्कळ पैसा कमावला. या क्रिकेटच्या उस्तादने समालोचनही केले आहे.

वेबसाईट ‘सेलिब्रिटी नेट वर्थच्या’ वृत्तानुसार वॉर्नची जवळजवळ ५० मिलियन डॉलर (३८१.८६ कोटी) एवढी संपत्ती आहे. त्याने ही संपत्ती क्रिकेट खेळून, समालोचन, व अन्य कामांतून कमावली आहे. निवृत्तीनंतर त्याने भरपूर लीग क्रिकेट खेळले आहे. दुर्दैव एवढेच की, इतकी वर्षे क्रिकेट खेळूनही त्याला ऑस्टेलिया संघाचे कर्णधारपद भूषवता आले नाही.

त्याने २२०७ मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ विकेट्स त्याने आपल्या नावे केल्या आहेत. सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९९२ मध्ये आपल्या कसोटी कारकीर्दीचा पहिला सामना भारताविरुद्ध खेळला होता. त्याने बरेचसे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :