Share

Uddhav Thackeray | “तुम्ही शिंदे गटाला मदत केली”, १२ मुद्द्यांचं पत्र लिहित ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके महाविकास आघाडीला पाठिंबा देणार होत्या. मात्र आता अंधेरी पोटनिवडणुकांसाठी मशाल चिन्हा कडून उमेदवार म्हणून लढणाऱ्या ऋतुजा लटके यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर त्यांच्या ऐवजी प्रमोद सावंत यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले आहे. लटकेंच्या राजीनाम्यावरुन वाद पेटत आहेत. मात्र, या बाबतची अजून अधिकृत घोषणा करायची बाकी आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून काही गंभीर आरोप केले आहेत. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र ठाकरे गटाकडून लिहिण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं असून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचं वाटप केलं आहे. तसंच आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलेलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे.

यासंदर्भात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांच पत्र लिहिलं आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिंदे गटाला जे हवं आहे, तेच त्यांना कसं मिळतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यासंदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now