तुमच पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाऊंट आहे; मग करा पोस्टाच्या ‘या’सुविधेचा वापर

पोस्ट ऑफिस

नवी दिल्लीः कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर दळणवळण तसेच खाजगी ट्रान्सपोर्ट व्यवसाय देखील बंद ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये अन्नधान्य, आरोग्य, बँकिंग याबरोबरच पोस्ट खात्याच्या मार्फत नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य सोयीस्कर रित्या पार पाडला गेल. लॉकडाऊन मध्ये वापरण्यात आलेल्या पोस्ट पोस्ट कार्यालयाला देखील फायदा झाला असून लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची नागरिकांचा पोस्टाची सेवा वापरण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांकडून पोस्टात गुंतवणूक करणं नेहमीच सुरक्षित समजल जात. मात्र अनेक कारणांमुळे लोकांकडून पोस्टात गुंतवणूक करणे कंटाळवाणे समजले जाते कारण पोस्टातील गर्दी हे त्यामागील मोठे कारण तर पोस्त अद्ययावत नसल्याने लोकांना तेथे गुंतवणूक करणे वेळखाऊ वाटते. मात्र आता यावर एक चांगला पार्याय उपलब्ध झाला आहे.

जर आपण पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट (RD) उघडलं असल्यास आपण घरबसल्या पैसे जमा करू शकता. IPPB (India Post Payments Bank) ऍपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा केले जाऊ शकतात. या अॅपच्या माध्यमातून आरडी अकाऊंटमध्ये मंथली हप्त्याला ऑनलाइन ट्रान्सफर केलं जाऊ शकते.

आरडीमध्ये ऑनलाईन डिपॉझिट करण्यासाठी आधी IPPB अकाऊंटमध्ये आपल्या बँक खात्याला ट्रान्सफर करा, OP प्रोडक्ट्सवर जाऊन रेकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडा, आरडी अकाऊंट नंबर आणि DOP कस्टमर आयडी भरा, त्यानंतर आरडीमध्ये इन्स्टालमेंट पीरियड आणि अमाऊंट टाका. विशेष म्हणजे इथे आपल्याला ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफरचं नोटिफिकेशन मिळणार आहे. त्याशिवाय आयपीपीबी सेव्हिंग्ज अकाऊंटवर इंडिया पोस्टाच्या दुसऱ्या योजनेसाठी पेमेंट केलं जाऊ शकतं.

महत्वाच्या बातम्या