‘तुमच्याकडे ४ दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या’; योगींना जीवे मारण्याची धमकी

yogi

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केलाय.

ही पहिली वेळ नाही आहे की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळते आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणी ज्या क्रमांकावरून धमकी आली होती त्याबाबत तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २९ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या ११२ च्या WhatsApp क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या धमकीमध्ये असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांकडे केवेळ ४ दिवस शिल्लक आहेत. या ४ दिवसात माझं काय करायचं ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल.

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून योगी आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांना आलेल्या या मेसेजमध्ये योगी यांच्या मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असं या धमकीत म्हटलं आहे. हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबरोबर ५० ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या