मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन विराट सभा घेऊन राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात अतिशय आक्रमक भूमिका घेतली. प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. आपला अयोध्या दौरा ही जाहीर केला. राज ठाकरे यांना हिंदुजननायक अशी उपाधीही लावली गेली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं आणि माध्यमांचं लक्ष राज ठाकरे यांच्यावर आहे. आता शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचीही तोफ धडाडणार आहे. सभेपूर्वी आतापर्यंत सभेचे तीन टीझर लॉंच करण्यात आले आहेत. या तिन्ही टिझर मध्ये हिन्दुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधले आहे.
तिसऱ्या टिझर मधील एक वाक्य मात्र सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या टिझर मध्ये उद्धव ठाकरे एक संवाद करत आहेत. “तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करतो,” असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या या संवादाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. कोणी या संवादाला शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, या दृष्टीने पाहतोय तर काहींनी या संवादाची खिल्ली उडवली आहे. यावर अनेक मिम्स ही व्हायरल होत आहेत.
मात्र आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत मुख्य फोकस हिंदुत्वावर असण्याची जास्त शक्यता आहे. भाजप, केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांचा समाचार घेण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :