“तुम्ही शेण खाता आणि दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेता”; राऊतांचा सोमय्यांना टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात किरीट सोमय्या आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरण चांगलंच गाजत आहे. परंतू काल हायकोर्टाने किरीट सोमय्यांना जामीनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिला आहे. न्यायलयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्यांवर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचं पितळ आता उघडं पडलेलं आहे, असं म्हणत राऊतांनी सोमय्यांना चांगलच फटकारलं आहे. त्याचबरोबर आता कोणी कितीही काही म्हणत असेल, तर त्यांना म्हणू द्या. कारण आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत.
आयएनएस विक्रांतचा घोटाळा हा 58 कोटींचा झालेलाच आहे. पैसे गोळा करून त्याचा अपहार झालेलाच आहे. त्यामुळे घोटाळा 58 रूपयांचा असो किंवा 58 कोटी रूपयांचा अपहार हा अपहार असतो. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आता ते असते, तर त्यांनीही आज अश्रु ढाळले असते. ज्या परिस्थितीमध्ये किरीट सोमय्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. तेव्हापासून मी काही विशिष्ट पक्षांच्या लोकांना पाहतोय. एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे प्रकार सध्या महाराष्ट्रात ज्याप्रकारे सुरू आहेत, ही एक गंभीर बाब असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच, विशिष्ट पक्षाच्या लोकांना मिळत असलेल्या या सगळ्या सुरक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना का नाही मिळत?, त्यांना अटकेपासून का संरक्षण दिलं जात नाही?, असे सवालही राऊतांनी उपस्थित केले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक आहेत, हे स्पष्ट दिसतं असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :