मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे ‘म्याव म्याव’ भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसलेले असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांच्याकडे पाहून म्याव म्याव असा आवाज काढला. नितेश काढलेल्या राणेंनी म्याव म्याव आवाज काढला याबाबत पत्रकार प्रश्न विचारत होते त्यावेळी नितेश राणेंच्या या कृत्यावर अजित पवार (Ajit Pawar) सभागृहामध्ये बोलत होते, असं पत्रकार म्हणताच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) उत्तर दिले आहे.
कोण अजित पवार? मी नाही ओळखत कोणत्या अजित पवार, असे म्हणत नारायण राणे अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नारायण राणेंना चांगलंच सुनावले आहे.
कोण अजित पवार?, हे त्यांनी ओळखण्याची गरज नाही. कोण अजित पवार, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्याप्रकारे आम्ही महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करत आहेत. तसेच सत्ता परिवर्तन करू असं म्हणत आहेत. परंतु भाजप स्वप्न पाहत आहेत आणि स्वप्न पाहणारा आणखी एक व्यक्ती निर्माण झाला आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणतात वर्ल्डकप जिंकू”
- “परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना?”, मुनगंटीवारांचा सवाल
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<