तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत

uadhav thakare

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतांना खंत व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना २५ वर्षे तुमच्यासोबत असताना तुम्हाला जरा अच्छे दिन आले आणि तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपला टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना नेहमीच भाजपच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. सत्ता आल्यावर आमच्या पदरात काही देत नाही; किमान धोंडे तरी टाकू नका. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी प्रकाशन सोहळ्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.