फेसबुकवर ‘लाईव्ह ऑडिओ’

मुंबई : फेसबुकने ‘लाईव्ह ब्रॉडकास्टिंग’चं फीचर सुरु केल्यानंतर आता यूझर्ससाठी फेसबुकने ‘लाईव्ह ऑडिओ’फीचर सुरु केले आहे. यामुळे ऑनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगला एक चांगला पर्याय ठरणार आहे.

फेसबुकने काही महिन्यांपूर्वीच ‘लाईव्ह ब्रॉडकास्टिंग’ची सुविधा केली आहे. ‘लाईव्ह ब्रॉडकास्टिंग’ला यूझर्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जगभरात हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे.

आता फेसबुकने लाईव्ह ऑडिओची सुविधा देण्याचीही घोषणा केली आहे. जगातील अनेक भागांमध्ये इंटरनेटचा वेग तुलनेत कमी असल्यामुळे व्हिडीओ प्रक्षेपणात अडचणी निर्माण होत.

‘लाईव्ह ऑडिओ’ या फीचरसाठी फेसबुकने बीबीसी आणि हार्पर कॉलिन्स या संस्थांची मदत घेतली आहे. याशिवाय काही लेखकांशीही करार करण्यात आला आहे. यांच्या मदतीने लाईव्ह ऑडिओच्या सेवेला नवीन आयाम प्रदान करण्यात येणार असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे.

सायबरविश्‍वात ऑनलाईन रेडिओ व पॉडकास्टिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या दोन्ही प्रकारांना फेसबुकची ही नवीन सुविधा आव्हान देईल, असे सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. हे फीचर सुरवातीला अँड्रॉईड आणि नंतर आयफोनसाठी उपलब्ध करुन दिलं जाईल.

You might also like
Comments
Loading...