कुणाच्या घरात घुसून तुम्ही आंदोलन करू शकत नाही! हायकोर्टाने ‘आप’ ला सुनावले खडेबोल

नवी दिल्ली: तुम्ही कुणाच्याही घरी किंवा कार्यालयात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? असा सवाल हायकोर्टाने आम आदमी पक्षाला विचारला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू आंदोलन सुरु केले आहे.

तुम्ही कुणाचे घर किंवा कार्यालयात घुसून आंदोलन करू शकत नाही, अशा कडक शब्दात नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हायकोर्टाने खडेबोल सुनावले.

नायब राज्यपालांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात भाजपाचे आमदार वीजेंद्र गुप्ता यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने आपच्या नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

You might also like
Comments
Loading...